बॅंगलोर सारख्या कानडी प्रांतातून नुकतीच मी मुंबईला आले कायमची आणि आल्या आल्या पाय मुरगळल्यामुळे डॉक्टरांनी minimum walking ठेवा अशी सुचना केली. आधीच मुंबई नवीन असल्यामुळे कधी इकडे तिकडे भटकायला जाते असं मला झालं होतं आणि त्यातच ही सुवार्ता कळली. म्हणुन फ़क्त निकडीच्या कामांसाठीच मी बाहेर पडत होते. एका महत्वाच्या आणि urgent shopping ची जबाबदारी माझ्यावर आणि माझी मुंबईतली unofficial guide पूनम आमच्यावर येऊन पडली होती, त्या निमित्ताने आम्ही दोघी पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहा जवळ च्या मार्केट मधे खरेदीला गेलो होतो. मी लहानपणापासुन पार्ला या ठिकाणाबद्दल ऐकत आले आहे, आई बाबांकडुन, मित्र मंडळींकडून, की पार्ला म्हणजे मुंबईतलं पुणं ! त्या मुळे उगाचच जरा उत्सुकता होती. थोडी फ़ार खरेदी झाल्यावर महत्वाच्या कामाची आठवण झाली. पेटपूजा .. !! :) तिथे मार्केट मध्येच असलेल्या चविष्ट पदार्थ मिळणा-या फ़ास्ट फ़ूड सेंटर मधे आम्ही जाऊन धडकलो आणि डोसा, पाव भाजी इ. ऑर्डर केले. मुंबई म्हणजे १२ पैकी १० महिने उकाडा, घाम ! त्यामुळे ९०% restaurants मधे AC असते हे सांगणे नव्हेच. आत्ता पर्यंत मला note करण्याएवढं विशेष असं काहीच आढळलं नव्हतं आणि of course मी काही असं मुद्दाम शोधत पण नव्हते. ऑर्डरची वाट बघत जरा २मि. शांत बसलो होतो आम्ही... वरती speakers मधुन instrumental music चा मंद, मधुर ध्वनी कानी पडत होता. नीट लक्ष देऊन ऐकले तर ’चांदणे शिंपीत जाशी’ या गीताची धुन होती.. मला अतिशय आश्चर्य वाटले.. मग पुढचं गाणं होतं ’तोच चंद्रमा नभात’ , त्या नंतर ’लव लव करी पातं ’, मग ’आला आला वारा’ ... प्रत्येक गीतानिशी मी चकीत आणि आनंदी होत होते...
अवघ्या मराठी संगीत विश्वातली एकूण एक अजरामर अशी गीते पेश होत होती !!
आधीच मी मागची २ वर्षे बॅंगलोर मधे असल्याने मराठी गाणी सार्वजनिक ठिकाणी ऐकायला मिळणे ही एक अशक्य घटना होती.. आणि आता तर महाराष्ट्रात पण सार्वजनिक ठिकाणी मराठी गाणी हा योग दुर्मिळच ! आणि त्यात असं मराठी गीतांचं pure instrumental music ऐकायला मिळणं म्हणजे पर्वणीच नाही का !!
पार्ल्याला मुंबई़चं पुणं का म्हणतात याची खात्रीची पावती मला मिळाली !
-अदिती
Tuesday, January 4, 2011
Subscribe to:
Posts (Atom)