कुर्ग ला न्यायला विसरलेल्या फ़रसाणाची विल्हेवाट, म्हणजे चांगल्या रितीने विल्हेवाट लावण्यासाठी :) arrange केलेल्या मिसळ पार्टी मधे राजे उर्फ़ गौरव ने पौर्णिमेच्या रात्री स्कंदगिरीच्या night trek ची कल्पना मांडली. स्कंदगिरीच्या night trek बद्दल आम्ही जवळ जवळ वर्षभर ऐकत होतो. म्हणजे चांगलं ऐकत होतो. :) आधीच night trek त्यामुळे आम्ही excited होतो त्यात पुनवेच्या राती वगैरे..म्हणजे अगदी दुधात साखर किंवा सोनेपे सुहागा.. situation ला साजेसं म्हणायचं तर ट्रेकात चांदणं :) असं झालं आणि भरीत भर म्हणजे ती रात्र शनिवार रात्र होती. म्हणजे अगदी साखरेच्या दुधात केशर किंवा आता बॅंगलोर मधे आहोत म्हणुन साखरेच्या दुधात बादाम पूड अशी situation झाली ! :) त्यामुळे १-२ लोक वगळता सगळे अगदी एका पायावर तयार !
२-३ दिवस उलटताच एका मित्राने त्याच्याकडे संग्रहीत असलेले स्कंदगिरीचे काही फोटो शेअर केले.. फोटो इतके अप्रतिम होते, की एक क्षण वाटून गेलं की ही कोण्या फोटो एडिटर ची तर कमाल नाही ? इकडचे ढग, तिकडचं आकाश आणि पलिकडचे डोंगर एकत्र करून सुंदर फोटो create करून खपवणारे भामटे आजकाल पुष्कळ असतात. पण नाही, त्या मित्राने, विवेकने सांगितले की अगं ते फोटो खरे आहेत. मित्राच्या कॅमेरातले. एडिटेड नाहीयेत. मग मात्र आमची उत्सुकता शिगेला पोचायला वेळ लागला नाही आणि ट्रेक ला अजुन २ आठवडे शिल्लक होते ! !
हळुहळु एकदाचा तो दिवस येऊन ठेपला. प्रत्येकासाठी ब्रेड बटर, ब्रेड जॅम, १ बिस्किट पॅकेट, २ चॉकलेट बार असं पॅकेज तयार केलं होतं. त्याचं वाटप करून एकदाचे आम्ही निघालो 7 bikes, 1 car अशी फ़ौज घेऊन. काही पुढे, काही मागे असं करत एका फ़ाट्याला येऊन पोचलो जिथे डावीकडे वळून स्कंदगिरीचा रस्ता जातो. तिथे वळलो खरं पण तिथुन पुढे मिट्ट काळोख ! आणि त्यात आला मधे एक त्रौक. म्हणजे तीन रस्त्यांचं जंक्शन. इथुन वळायचं कुठे ! तिथे एकमेव कन्नड पाटी होती. आता आमच्यातल्या एका मित्राला अभिजितला अस्खलित कन्नडा बोलता येत होतं पण वाचता येत नव्हतं. म्हणजे कन्नडा वाचता येत नव्हतं :) त्या मुळे झाले वांदे. सर्वात पुढे असलेल्या कारने डावीकडे गाडी वळवली खरी पण थोडं पुढे आल्यावर २-३ जणांना शंका आली आणि रस्त्यातच थांबलो. आता पुढे जायचं की मागे काही कळेना. एक क्षण वाटलं आता ट्रेकही इथेच, सुर्योदयही इथेच. :D. मग २ जण परत मागे आले आणि त्या junction ला पोचून तिथे कोणाला तरी विचारु म्हणुन तिथे येऊन थांबले. तिथेही काळं कुत्रं नव्हतं चौकशी करायला. मग काही वेळात एक टेंपो आला. त्याच्याकडुन रस्ता कळला.. आम्ही रस्ता चुकलोच होतो. उरलेले सगळे मग आल्या पावली मागे फ़िरले आणि परत सगळे junction ला पोचले. आणि मग आम्ही योग्य(?) वाट धरली. टेंपोवाला पुढे आणि आम्ही मागे अशी आमची फ़ौज. ५ मि. आम्ही आपले टेंपोला follow करतोय. मग प्रत्येकाचे कल्पक तर्क सुरू. ’अरे, टेंपोवाला आपल्याला kidnap तर करत नाहीये’, ’टेंपोवाल्याने आपल्याला एका निर्जन ठिकाणी (अजुन काय आता डोंबल निर्जन !) नेऊन आपल्याकडच्या सामानावर दरोडा टाकला तर’.. अजुन निरनिराळे तर्कवितर्क येण्या आधीच स्कंदगिरीचा पायथा आला.. हुश्य !
तिथे पार्कींग, urgent calls :), Guide hire करणे इ. time pass गोष्टी उरकल्यावर आमचा ट्रेक सुरू झाला. एव्हाना २ वाजून गेले होते. १९ जण ३ ग्रुप मधे आपोआप divide झाले. गाईड obviously सर्वात पुढे होता. आमच्यातल्या एका मैत्रिणीला अस्थमाचा त्रास असल्यामुळे आमची ६-७ जणांची सर्वात शेवटची बॅच निवांत चढत होती. अरुंद, रुंद, सोप्प्या, अवघड, खडकाळ, सपाट अशा विविध वाटांमधून टॉर्च च्या मदतीने (नाही, पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चांदण्याचा प्रकाश पुरेसा असेल असं तुम्हाला वाटत असेल पण तसं काही नव्हतं. निदान आमच्या सारख्या नवोदितांना तरी नव्हतं. ) वाट काढत एकदाचे आम्ही त्या शिखरावर पोचलो. ४.३० वाजुन गेले होते. काही आधीच पोचलेली मंडळी आमची वाट पहात थांबली होती. पोचताच जाणवला तो वेड्यासारखा गार वारा तोही बोचणारा ! त्यामुळे गाईड ने सुचवलेल्या(त्याच्या लाकुड विकणा-या मित्रांचा business नको का व्हायला! ) शेकोटीची कल्पना हो-नाही करत(कारण काही वेळात सुर्योदय होईल असं वाटलं) संपन्न करण्याचं ठरवलं. पुनवेची रात्र / पहाट अन त्यात शनिवार वगैरे (पहिला परिच्छेद वाचणे) असल्यामुळे जिकडे तिकडे corner corner ला नुसता लोकांचा सुकाळ. शेवटी विवेक ने एक झकास corner cum उंचवटा शोधून काढला. तिथे आम्ही आमचा काही तासांचा मुक्कम ठोकला.
शेकोटी पेटल्यावर जराशी मिळालेली ऊब सुद्धा वाळवंटात मिळालेल्या पाण्याच्या २ घोटांएवढी मोलाची होती. कदाचित वाटेल , जरा अतीच लिहिलंय. जर इथेच ही परिस्थिती असेल तर तिकडे वरती काय हाल होतील, सिमला, मनाली ला.. खरंय..पण त्या वेळी खरंच वाईट्ट वारं होतं.
तिथेच सगळ्यांकडे आपापलं breakfast parcel मी सुपुर्त केलं, सगळ्यांनी ते मटामटा खात संपवलं.
शेकोटी असल्यामुळे मग गाण्यांचा मूड बनला आणि आठवतील तशी
उडे जब जब जुल्फ़े तेरी
हमे तो लुट लिया मिलके हुस्न वालो ने
चम चम करता
तेरा होने लगा हू (हे शेकोटीला शोभत नाही, पण तरी )
वगैरे गाणी म्हणायला सुरूवात झाली.
मग निखिल ने काही शेकोटी स्पेशल गाणी म्हटली..
काही वेळात मग सगळ्यांना सुर्योदयाचे आणि काही जणांना निद्रापुर्तीचे वेद लागले.. :)
हळुहळु आम्ही सगळे पुर्वेला असलेल्या एका उंचवट्यावर येऊन थांबलो. वारा सुसाट वाहात होता !
हळु हळु वाट लागत चालली होती ! १०-१५ मि. उलटली तरी सुर्यदेव काही येईना. आता ये बाबा एकदाचा असं वाटायला लागलं ! त्या बोच-या वा-याची आठवण पण नकोशी वाटते ! आणि अजुन १० मि. गेल्यावर थोडंसं उजाडायला लागलं. काळं आकाश हळुहळू निळसर रंगाने व्यापून गेलं.
त्या नंतरही नेहमीचा आपला सुर्योदय होईल असंच एक feeling होतं, निदान माझ्या मनात तरी. मग केशरी रंग दिसू लागला.. आता मात्र सुर्योदयाचे वेद लागायला लागले. मग हळुहळू त्या तेजाच्या केशरीबुंद गोळ्याचं ऐटीत आगमन सुरू झालं. जिकडे तिकडे कॅमेराज अन फोटोग्राफ़र ! काही क्षणातच सुर्याचा पुर्ण गोळा आपल्या स्थानावर विराजमान झाला.. अन काय सांगावं. अचानक लक्ष गेलं तर ढगांचे पुंजके च्या पुंजके गोळा झाले होते... दरीतून खाली दिसणारं गाव, गावातली घरं, शेती हे सगळं धुसर होत चाललं होतं. आणि समोर नजर टाकली तर सगळे ढग ग्रुप करून पिकनिक ला निघाले आहेत की काय असं वाटत होतं.. क्षणा क्षणाला ढगांची संख्या वाढतच होती.. आता दरीतून खाली दिसणारं गाव पुर्ण पणे झाकलं गेलं होतं. डावीकडुन उजवीकडे अशी १८० डिग्री मधे मी माझी मान वळवली आणि जे समोर होतं त्याने माझे डोळे अक्षरश: दिपून गेले..
जिकडे तिकडे नुसते ढगच ढग. आता तुम्ही म्हणाल हिचं ढग पुराण कधी संपणार ! पण खरंच ते दृश्य कदापि विसरणं शक्य नाही. आपण Hill Station वर जे Sunsets, Sunrises बघतो, तिथेही नक्कीच ढग असतात, पण ते विरळ असतात.. प्रत्येक पुंजका मोजता येईल असे असतात. पण इथे म्हणजे ढगांचा मोठ्ठा गालिचाच तयार होता, नव्हे.. ढगांचं मऊ, गुबगुबीत अशी गोधडीच तयार झाली होती.
एखाद्या चांगल्या चित्रकाराने काढलेल्या चित्रात असं नक्कीच बघायला मिळेल किंवा एखाद्या animated movie मधे ! पण प्रत्यक्ष बघताना काय वाटत होतं, हे शब्दातीत आहे !
असं वाटत होतं की आजुबाजुचं सगळं काही डोळ्यात भरून घ्यावं .. अगदी भरभरूऊऊऊऊन ! असं मला या आधी कुठलाही सुर्योदय, सुर्यास्त किंवा अजुन कुठलाही डोंगर, दरी पाहून वाटलं नव्हतं .. ढगांचे नुसते थरावर थर आणि मध्यभागी तप्त सुर्याचा केशरी गोळा, करावं तितकं वर्णन कमी आहे ह्या दृश्याचं ! ! कित्तीतरी वेळ मी कॅमेरा, फोटो हे सगळं विसरून गेले होते.. कोण कुठे आहे याचंही भान मला नव्हतं.. मला फ़क्त ते सुंदर दृश्य एक कायमची आठवण म्हणुन डोळ्यात टिपून घ्यायचं होतं !
थोडंफ़ार फोटो सेशन झाल्यानंतर परत खादाडीचा मूड बनला. तिथे असलेल्या टपरीतून गरम गरम पाणीदार मॅगी, बेचव ऑमलेट यांची चव घेताक्षणी आमची हौस फ़िटली ! :D मग हळुहळू उतरायला सुरूवात केली. उतरतानाही आमची बॅच शेवटची ठरली. निवांत, रमत गमत, अधुन मधून फोटो सेशन करत आम्ही उतरलो.
नंतर अनेक दिवस असंच मनात येत राहीलं, कोणास ठाऊक त्या पहाटे कुठे होतो आम्ही .. ! !
Friday, April 2, 2010
Tuesday, February 2, 2010
स्कंदगिरीचा सुर्योदय - एक संस्मरणीय अनुभूती !
कोणास ठाऊक कालच्या पहाटे कुठे होतो आम्ही .. कुठे गेलो होतो आम्ही हे देखील माहीत नाही असं वाटुन अचंबित झालात!?. पौर्णिमेच्या रात्री खडक, दगड धोंडे, अरुंद पाय वाट या सगळ्यातून आम्ही ट्रेक करत स्कंदगिरी नावाच्या टोकावर पोचलो होतो खरी, पण झोंबणारं गार वारं, आजुबाजुला पहावं तिथे पांढ-या शुभ्र ढगांच्या झालरी की ढगांच्या लाटाच त्या की डोंगर द-यांना मिळालेलं ढगांचं गुबगुबीत पांघरुण ! आणि त्या ढगांच्या पल्याड उगवणारा तो तप्त केशरीबुंद तेजाचा गोळा की जणु दरबारात राजमार्गाने ऎटीत आगमन करणारा राजा, हे असं दृश्य पाहून नंतर पुन्हा पुन्हा हेच वाटत राहीलं ..
ते ठिकाण स्कंदगिरी होतं की स्वप्ननगरी, की निसर्गाच्या अमाप, अद्वीत सौंदर्याचं दर्शन घडवणारी अनुभूती ! !
म्हणुनच म्हटलं कोणास ठाऊक कालच्या पहाटे कुठे होतो आम्ही ..
- अदिती
Thursday, December 3, 2009
बॅंगलोर मधे दांडीया रास ??? ... होय .. बॅंगलोर मधे दांडीया रास ! !
इतकी वर्षं नवरात्री - गरबा - दांडीया हे महाराष्ट्रात जरी भरभरून असलं तरी आम्ही सगळे मित्र-मैत्रीणी उत्साहाने टिप-या घेऊन दांडीया खेळायला गेलोय असं कधीच घडलं नव्हतं. आधीच टिप-या हातात कश्या धरायच्या इथपासून सुरुवात ! मग टिप-या खेळताना (खरं तर मारताना) त्या आपल्या पार्टनर च्या टिप-यांनाच लागताहेत की त्यांच्या बोटांना, मनगटाला लागत आहेत ही भिती (आणि मनातून गंमत), आणि त्यात भर म्हणजे लागलेल्या गरबा गाण्यांच्या तालाचा perfect अंदाज घेत योग्य वेळी योग्य टिपरी योग्य टिपरीलाच लागली पाहीजे..! छे !! भलतंच अवघड !! आणि perfect किंवा परिपूर्ण गरब्यासाठी चेह-यावर स्मितहास्य, नाचताना grace आणायची आणि हे सगळं ठेका न चुकवता ??!! तर एकूणच सगळा आनंदी आनंदच !
आणि अशा परिस्थितीत बॅंगलोर मधे आम्हाला - मी, प्रिया आणि काही मित्र मंडळी - रास दांडीया ला जाण्याचा chance मिळत होता ! म्हटलं चला जाऊन तर बघू. पॅलस ग्राऊंड नावाच्या ग्राऊंड वर भव्य मंडप उभारुन रास दांडीया साठी खास सेट उभा केला होता. रात्री ९ पर्यंत पोचल्यास मुलींना free entry होती. आता फ़ुकट कार्यक्रम, फ़ुकट पार्टी, फ़ुकट जेवण (quality जेवण हं!)यावर झडप घालणारे आम्ही साहजिकच free entry साठी कधी नव्हे तो वेळेत पोचायचा आटोकाट प्रयत्न करणार यात तिळमात्र शंका नव्हती. पण पॅलस ग्राऊंड चं मुख्य गेट माहीत आहे असं म्हणवणा-या आमच्या एका हुशार(?) मित्राच्या मागे गोल गोल फ़िरत ९ कधीच वाजून गेले. हो, गोल गोल अश्यासाठी की आम्ही पॅलस ग्राऊंड च्याच भोवती फ़िरत बसलो होतो मुख्य entrance gate शोधत !! :)
आणि एकदाचं ते गेट सापडल्यावर आम्ही आत जाण्याच्या लगबगीत असताना तिथल्या Guard ने आम्हाला अडवलं. ’मॅडम तिकिट ? ’. Free entry ची स्वप्नं बघत आणि मुख्य गेट सापडल्याच्या नादात ९ वाजून गेले आहेत याचं भान राहीलं असतं तर काय !.. झालं .. सगळयांनी रांगेत उभे राहून शिस्तीत्त १५० रु. चं तिकिट काढलं. तिकिट परवडेबल होतं. बॅंगलोर मधे आल्यावर १५० रु. १५रु. असल्यासारखे वाटतात ! असो. तर आत गेल्यानंतर पाहिलं की डावीकडे खाण्यापिण्याचे स्टॉल होते.. आणि उजवीकडे मुख्य रिंगण गरबा खेळण्यासाठी. आत चक्कर टाकली आणि पाहिलं की स्टेज वर छान वाद्यं मांडून ठेवली आहेत.. ड्रम्स, ढोल, तबला, बासरी, key board ..वाटलं.. असतील एखाद्या ऑरकेस्ट्राची. थोड्या वेळाने सगळे बाहेर आलो. म्हटलं जरा खादाडी करावी.. तोच आमचा "डिनर" होता.. पाव भाजी, कच्छी दाबेली, वडा पाव, बर्फ़ाचा गोळा,ऊसाचा रस अश्या पदार्थांची रेलचेल होती. पाव भाजी सोडली तर सगळे पदार्थ rare cateogry मधले होते, rare म्हणजे बॅंगलोर मधे मिळण्याच्या दृष्टीने ! म्हटलं दाबेली, वडा पाव चे प्रयोग नको. पाव भाजी घेऊन पाहावी.. बॅंगलोर मधे आत्तापर्यंत खाल्लेली ती सर्वोत्कृष्ट पाव भाजी होती. खास मुंबई स्टाईल ! मनसोक्त हादडल्यावर आणि गरब्याची गाणी ऐकू यायला लागल्यावर म्हटलं चला CD play केली वाटतं गरब्याची म्हणुन आत गेलो गरबा खेळण्यासाठी. आणि मी पाहातच राहिले. ती गाणी live चालू होती !!! गायक, गायिका, वाद्यवृंद असा सगळा live ऑरकेस्ट्रा होता. (मला हे नंतर कळलं की सगळीकडे दांडीया निमित्त असंच असतं.. recorded CD वगैरे नसते. पण माझ्यासाठी ते नवीन आणि थक्क करणारं होतं.) आणि सगळे इतके तालात सुरात होते की खरंच बाहेरून नुसतं ऐकून recorded गाणीच वाटत होती. रिंगणात सगळं गुज्जू पब्लिक नटुन थटुन आलं होतं आणि सगळे गरबा खेळत होते.. सुरूवातीला आम्ही त्या रिंगणात जायला धजत नव्हतॊ. कारणासाठी पुन्हा पहिला परिच्छेद वाचणे. :) पण मग १५०रु. ची पावती हातात बघताच मुकाट्याने आम्ही एकदाचे रिंगणात सज्ज झालो आणि बाकीच्यांची कॉपी करत ताल धरण्याचा प्रयत्न करत गरबा खेळायला सुरूवात केली. गरबा टाळ्या वाजवून खेळतात आणि दांडीया टिप-यांनी हे मला त्या दिवशी कळलं.
तर खुप वेळ गरबा खेळल्यावर (?) पुन्हा पोटात कावळे ओरडायला लागले. चला ! परत पोटपुजेला आम्ही आपले बाहेर स्टॉल्स कडे कुच केले. यावेळी म्हटलं जरा वडा पाव, दाबेली try तर करून बघू. म्हणुन मी आणि प्रियाने दोघात एक वडा पाव घेतला. १०रु. ला एक. स्वस्तच वाटला. :) वडा पाव serve करताना त्यांनी पावाला गोड चटणी लावली, आणि वडा पाव बरोबर मस्त झणझणीत लसणाची चटणी आणि मीठ लावलेल्या हिरव्या मिरच्या ! बघूनच ’दिल खुष हो गया’ आणि चवीला पण इतका कमालीचा झकास होता वडा पाव की आम्ही लगेचच अजून २ वडा पाव आणि २ दाबेलीची order दिली. आता खरंच अती वाटेल पण दाबेली सुद्धा उत्कृष्ट होती, खास गुजराथी पद्धतीची! खमंग आणि चविष्ट ! झकास हाच योग्य शब्द आहे खरं तर. आम्ही अहमदाबाद च्या किंवा बडोद्याच्या कुठल्या तरी खाऊ गल्लीत आलो आहोत असं एव्हाना वाटायला लागलं होतं आम्हाला !
कारण स्टॉलवाले पण गुज्जु! त्यामुळे ते एकमेकांशी गुजराथीत बोलत होते.
आता जरा desert होऊन जाऊ दे, म्हणुन बर्फ़ाचे गोळे खाल्ले. काला खट्टा,मिक्स,रोझ असे flavours try केले..... अनपेक्षित अशी मनसोक्त आणि मनासारखी खादंती झाल्यानंतर आठवलं अरे आपण दांडीया खेळायला आलो आहोत. :) परत आत गेलो आणि दांडीयाची गाणी सुरू झालेली असल्यामुळे टिप-या हातात घेऊन रिंगणात आलो.(युद्धासाठी सज्ज झाल्यासारखंच वाटत होतं) आम्ही परत कॉपी करत करत तालाचा अंदाज घेत योग्य वेळी योग्य टिपरी योग्य टिपरीला लावत मनसोक्त दांडीया खेळलो. संथ लयीपासून द्रुत लयीकडे कलणारी गाणी अतिशय सुंदर गायली जात होती हे वेगळं सांगायला नकोच !
रात्रीचा १ वाजल्यावर आम्ही सगळ्यांना चला चला म्हणत अक्षरशः रिंगणातून बाहेर खेचत आणलं. आणि घरी निघालो.
असा हा रास दांडीया चा सुरेल, उत्साहमय अनुभव आणि खाऊ गल्ल्या किंवा चटपटीत street food चा आधीच उल्हास असलेल्या बॅंगलोर मधे दांडीया रास(निमित्तमात्र)मुळे आम्हाला मिळालेल्या अश्या अनपेक्षित चविष्ट Treat मुळे ती संध्याकाळ आमच्या आठवणींच्या कोंदणात कायमची कोरली गेली !
-अदिती

Friday, October 16, 2009
उकडीचे मोदक - माझा पहिला वहिला प्रयोग
आता राहिलेला होता खरा challenging भाग. तांदुळाची पिठी घेतली आणि आईने सांगितल्या प्रमाणे उकड करायला सुरूवात केली.उकड शिजली.गॅस बंद केला पण तरी उकड खूप घट्ट वाटत होती. अजुन मऊसर हवी असं वाटत होतं. आईच्या सल्ल्याने पाणी टाकुन फ़ेरफ़ार बदल केले आणि पटापट मोदक करायला घेतले. पहिला मोदक अगदी सुरेख सुबक नसला तरी मोदक वाटावा इतपत आकार त्याचा नक्कीच आला होता. आपण खुष झालो एकदम आणि मग पटापट पुढचे मोदक करायला घेतले. जसजसे पुढचे मोदक करायला लागले, तसतसे उकड गार होत असल्यामुळे मोदक वळवायला त्रास व्हायला लागला. एकीकडे ऑफ़ीसची वेळ होत होती. आपली धावपळ होत आहे हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.
घरी कॅब घ्यायला येते पण मोदक प्रकरणामुळे cab काही आत नशीबात नसणारे असं वाटून मी एका cabmate ला कळवलं की आज मी कॅब ने नाही येणार. केलेल्या उकडीचे एकुण ९ मोदक केल्यानंतर शेवटी थांबले; सारण तसंच ठेवलं. मग मोदक उकडायला लावले. आणि ऑफ़ीस च्या तयारीला लागले. मोदक घेऊन निघाले तेव्हा लक्षात आलं.. नेहमी निघते त्या पेक्षा २० मि. उशीर झाला होता. बाहेर पडले रिक्षा शोधायला.. आणि काय वाटलं कोण जाणे मी cabmate ला फोन केला विचारायला की कॅब निघून गेली आहे का .. कधीतरी चुकून traffic मुळे cab ला उशीर होतो म्हणुन म्हटलं चान्स घ्यावा आणि काय news मिळावी मला !! cab अजुन माझ्या घरावरून पास झालीच नव्हती. मी लगेचच त्याला सांगितलं की मला घ्यायला या मग. अशा प्रकारे मोदक पण झाले आणि cab पण चुकली नाही. मी देवाची भक्त बिक्त असते तर मी म्हणाले असते की ’भगवान ने मेरी सुन ली’(tone जरा filmy style मधे) गणरायानेच कॅब उशीरा पाठवली कारण त्याच्या साठीच नैवेद्य करत होते ना.. :)
ऑफ़ीस मधे पोचल्यावर लगेचच माझ्या मराठी मित्र मंडळींना मी Pantry त बोलावलं. मोदक पाहुन सगळ्यांची कळी खुलली हे वेगळं सांगायलाच नको. तुपाची बाटली पण नेली होती मुददाम. गणपतीच्या काळात उकडीचे मोदक निदान एक एकच का होईना पण खायला मिळाला त्यामुळे जनता खुष झाली. आणि मी तर जाम खुष होतेच !
-अदिती
Friday, October 2, 2009
निलेश मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !
गर्द केशरांची फ़ुले आणि सनईचे सूर
सारे असती भोवताली तरी मनात काहूर ॥
स्वप्नात माझिया फ़ुलती दोन केशरांचे दिवे
नव्या वयाचे गुज, रोमरोमी गंध नवे ॥
दिल्या सोडून पाण्यात मी बालपणीच्या होड्या
उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ॥
नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट
त्याच्या माझ्या मनामधे अबोलसा अंतरपाट ॥
सध्या मराठी दूरदर्शन जगतात चालु असलेल्या मालिकांच्या पुरामधे ’अंतरपाट’ ही अजुन एक नुकतीच सुरू झालेली मालिका. आणि इतर मालिकांप्रमाणेच हिला सुद्धा एक अद्वीत,अतुल्य शीर्षक गीत किंवा title song लाभलं आहे; किंबहुना हे म्हणीन की मालिकेचा विषय फ़ारसा नवीन नसला तरी शीर्षक गीत खुपच छान रचलं गेलंय. त्या गाण्यामधे एक वेगळेपणा आहे; freshness(हो, हाच शब्द योग्य आहे.. ताजेपणा वगैरे लिहिण्यापेक्षा)आहे. आता गाण्याचा मुळ बाज अर्थात लग्न, लग्नाळु मुलगी, लग्नाचं वातावरण याच्याशी मिळता जुळता आहे आणि असायलाच हवा, पण तरी निलेश मोहरीर ने ते इतक्या अप्रतीम प्रकारे रचलं आहे की तोडच नाही.
गाण्यातील काही जागा खरंच भाव खाऊन गेल्या आहेत. खास करुन ’माझिया’ मधलं ’या’ म्हणताना ’दिवे’ वरून ’नव्या’ वर येताना किंवा रोमरोमी मधला रोमी म्हणताना, ऐकताना मिळणारा आनंद शब्दातीत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या नंतर background वर येणारा गायकाचा आलाप तर गीताचं सौंदर्य द्विगुणीतच करतो. पुन्हा बेलाच्या आवाजातलं ’दिल्या सोडून पाण्यात’ ह्या शब्दांचे सूर तर कोणत्याही मुलीच्या किंवा व्यक्तीच्या ...असं म्हणणं जास्त योग्य ठरेल... ह्रदयाला हात घालतात. आणि ’उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ... नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट ’ हा patch तर हे गाणं अद्वीत होईल याची काळजी घेतो. आणि ’अंतरपाट’ हा शब्द शेवटी गायला जातो त्या क्षणी सुरावटींच्या सुखद सुंदर प्रवासानुभवातून जाऊन आपण मंत्रमुग्ध झालेलॊ असतो. फ़क्त एवढंच की गाणं डोक्यात register होण्यासाठी २-३ दा तरी ते लक्षपुर्वक ऎकायला हवं.
प्रत्येक मुलीमधे दडलेली निरागसता, मिश्किलपणा, फ़क्त स्वत:शी साधलेला संवाद, मनाशी असलेला प्रामाणिकपणा या सगळ्याची पुरेपूर आठवण हे गाणं ऎकताना होते.. निदान मला तरी झाली.
निलेश मोहरीर ने या आधी ’कळत नकळत’ आणि ’कुलवधु’ या मालिकांची शीर्षक गीतं रचली आहेत.’कळत नकळत’ हे वैशाली सामंतने म्हटलं आहे आणि ’कुलवधु’ वैशाली माडेने गायले आहे. आणि आता हे ’अंतरपाट’ गायलंय बेला शेंडेने. ही तिन्ही गाणी इतकी वेगळी,तोडीस तोड आणि गोड सुरावटींची आहेत... आणि या तिन्ही गायिकांनी देखील ह्या गाण्यांना योग्य न्याय दिला आहे. निलेशने सुद्धा प्रत्येक गाणं वेगळ्या गायिकेला देऊन आपलं वेगळेपण जपलं आहे. म्हणुनच म्हटलं मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !
-निलेश ची नवीन फ़ॅन
अदिती

Monday, July 27, 2009
फोटोग्राफ़ीचं ऊत कारण ऑर्कुट,फ़ेसबुक चं भूत !
"ए वाव, कसले सही फोटो आहेत, मी आजच ऑकुट वर लावते"
"कूल... फ़ेसबुक साठी आयडिअल आहेत हे पिक्स"
हे असे डायलॉग आता काही नवीन नाहीत.
परवा आम्ही सगळे बोटॅनिकल गार्डन बघायला गेलो होतो. आता बोटॅनिकल या शब्दातूनच जाहीर आहे की वेगवेगळ्या प्रकारची, रंगांची, आकारांची सुंदर फ़ुले आपल्याला पाहायला मिळणार. त्या मुळे बागेत शिरल्या शिरल्या एक कटाक्ष टाकताच अतिशय सुंदर दृश्याने डोळे दिपून गेले..जिकडे तिकडे रंगीबेरंगी फ़ुलं, त्याच्या जोडीला हिरवीगार झाडी... प्रत्येक फ़ुलझाडाचं नाव, त्याची माहीती अगदी व्यवस्थित. पण आपलं लक्ष कुठे असतं ...तर कोणत्या बॅकग्राऊंड वर ग्रुप फोटो छान येईल.. आणि कोणत्या फ़ुलांबरोबर आपला individual snap छान येईल.. काय करायचंय ग्रुप फोटो किंवा individual snap घेऊन? तर.. ते लावायचे आहेत ऑर्कुट वर... कोण बघणार ते फोटो.. तर फ़क्त ऑर्कुट मार्फ़त संपर्कात असलेली so called मित्र मंडळी.. कारण जवळच्या लोकांना आपण either पिकासा चं invitation पाठवतो किंवा डायरेक्ट attach करून पाठवतो...नाही का ! आता मग पुढचा प्रश्न हा की मग फोटो काढायचेच नाहीत का, किंवा फ़ेसबुक, ऑर्कुट वर लावायचे पण नाहीत का... फोटो जरूर काढायचे...ऑर्कुट वर पण जरूर लावायचे ..
पण ज्या ठिकाणांचे फोटो घेऊन किंवा ज्या ठिकाणांच्या बॅकग्राऊंड वर स्वतःचे फोटो घेऊन तुम्ही आठवणींची साठवण करत आहात त्या जागेचा भरभरून निदान आनंद तरी घ्या !!
हिरवे तपकिरी डोंगर, गार वारा, पक्षांचा मंजूळ आवाज, निळंशार पाणी, पावसाची रिमझिम, समुद्राच्या लाटांची खडकांवर झेप, सुर्याच्या किरणांमुळे झालेलं विविध रंगछटांनी माखलेलं आकाश हे सगळं प्रत्यक्षात अनुभवण्यात एक वेगळी मजा आहे ...खरंच फोटोंमधून तेवढी मिळते का मजा ? किंबहुना त्या सुंदर निसर्गाचा आनंद घेताना मधे मधे इकडे फोटो तिकडे फोटो करता करता निसर्गाची मजा राहते बाजुला.
आता ही गोष्ट वेगळी की फोटोग्राफी हाच हेतू ठेवुनच आपण काही ठिकाणांना भेट देतो. ते वेगळं.पण इतरवेळी आपण
आपल्याकडे कॅमेरे आहेत हे जरा विसरून डोळ्यांच्या कॅमेरात हा निसर्ग टिपून बघितला तर माझी खात्री आहे त्या आठवणी पण आपल्या ह्र्दयात कायमस्वरुपी साठवण बनून राहतील.
आपल्या साठी फोटो आहेत, फोटॊंसाठी आपण तर नाही ना !

Friday, July 17, 2009
चविष्ट रविवार
रविवारी सकाळी ब्रेकफ़ास्ट किंवा दुपारच्या जेवणाच्या च्या निमित्ताने कोणाच्या तरी घरी जमून गेट टुगेदर करणे काही नवीन नाही.. त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो खाद्य पदार्थांचा जे अर्थात त्या घरातल्या मुलीने/बाईने केलेले असतात किंवा फ़ार फ़ार तर बाहेरुन मागवलेले असतात. पण मागच्या रविवारी मात्र आम्हाला ब्रेकफ़ास्ट आणि दुपारचं जेवण चक्क आमच्या २ मित्रांच्या हातचं मिळालं.
MS करायला US ला निघालेल्या आमच्या अभिषेकच्या हातचे चविष्ट पोहे आता मिळणार नाहीत म्हणुन हळ्हळणाऱ्या आम्हाला पाहून सदगदीत झालेल्या अभी ने आम्हाला उत्साहाने रविवार सकाळी पोहे पार्टी चे आमंत्रण दिले ! आम्हीही पुन्हा चविष्ट पोहे मिळणार म्हणुन (की रविवार च्या नाष्त्याची सोय झाली म्हणुन :) ) खुष झालो. आणि अगदी रविवारी भल्या पहाटे ९.३० ला आम्ही अभिषेकच्या घरी जाऊन धडकलो..
साहेबांसाठी आमचा आवाज हा alarm होता म्हणजे थोड्क्यात अजुन त्यांची सकाळ सुरुही झालेली नव्हती.. पण लगेचच घाईघाईने कांदा, पोहे, मिरची, कोथिंबीर, लिंबू इ. सामान आणुन एखाद्या सुगरणीसारखी जय्यत तयारी सुरू केली.
आणि मग पटापट आम्हा ८-९ लोकांसाठी मस्तं पोहे केले.. आमच्या एका मैत्रीणीची-प्राचीची मदत घेतली थोडी.. पण तेवढी cheating चालते ! :)
अशा प्रकारे श्री. सुगरणाच्या हातच्या गरमा गरम पोह्यांवर कोथिंबीर पेरून, शेव भुरभुरून त्यावर मग मस्तं रसदार लिंबू पिळून आम्ही त्या पोह्यांवर ताव मारला.
त्या नंतर आमच्या ग्रुप मधे असलेल्या एकमेव सरदारजी ने त्याच दिवशी दुपारी आम्हाला "दावत" दिली होती जेवणाची. त्याने चक्क स्वतः तयार केलेल्या भाज्या म्हणजे : बेंगन भरता आणि राजमा , तोही १० जणांसाठी !!
मी आणि प्रिया, पराठे आणि रायता करणार असं आधीच ठरलं होतं !
घरी पोचल्या पोचल्या पाजी ने बेंगन भरता आणि राजमा टेस्ट ला दिला आणि ती चव चाखून आमचा विश्वासच बसेना की ते खरंच त्याने स्वतः केलं आहे !!! इतक्या अप्रतिम झाल्या होत्या दोन्ही भाज्या की खरंच शब्द नाहीत.
मसाले, ग्रेवी एकदम परफ़ेक्ट !
दुपारी २.३० वाजता अक्षरशः बोटं चाटत आम्ही सगळा स्वॆपाक फ़स्त केला !
त्याचा परिणाम हा झाला की रात्री जेवणाची गरज पण भासली नाही..
अशा प्रकारे हा रविवार चविष्ट झाला तो २ Mr. सुगरणांमुळे !!
बदलला की नाही जमाना खरंच ! :)

Subscribe to:
Posts (Atom)