लिफ्ट मधे माणसं शिरतात तेव्हा...
लिफ्ट मधे माणसं शिरतात तेव्हा...ही माणसं म्हणजे ना... आई शप्पथ काय सांगू तुम्हाला कसला गोंधळ घालतात !! तसं आम्हाला लिफ्ट प्रकार वापरण्याचा योग येतच नाही म्हणा... भिंत आणि लिफ्ट मधली फट हीच आमची लिफ्ट. त्यातून झरकन धावत आम्ही मजले पार करतो रोज.. तुरुतुरु, दुडूदुडू अशी विशेषणं देखील आम्हाला याच माणसांनी दिलीयेत. असो. तर मुद्दा काय की परवा मला सोसायटी मीटिंग साठी वरच्या मजल्यावर श्री. सरडे यांच्याकडे जायचे होते. सौ. पालकर, श्री. झुरळे आणि कधी नव्हे तो Miss चिचुंद्रे सुद्धा येणार होत्या. आता असा Golden chance मी सोडणार होतो होय! फक्त मनात आलं आज जरा या माणसांची Lift वापरून बघू ४ मजले धावण्यापेक्षा. म्हणून लिफ्ट ची फट उघडण्याची वाट बघत बसलो. १०मिनिटातच फट उघडली. कोणी २-३ माणसे शिरली.
तसं मी पण चपळपणे झरकन आत शिरलो. २ सेकंद झाले नाही आणि जोरजोरात किंचाळण्याचा आवाज यायला लागला. मी पण बावचळून इकडे तिकडे बघायला लागलो तर १ मुलगी आणि २ काका, काकू होते. जोरजोरात ओरडणारी तीच मुलगी होती. आणि ते काका मजेशीर होते. मुलगी किंचाळतेय आणि ते मात्र हसत होते फिदिफिदी. पुढच्या १० सेकंदांत काय झाले कळले नाही, ती मुलगी उड्या मारायला लागली. आणि किंचाळणे चालूच. आणि काही केल्या मला कारणच कळत नव्हते. अचानक झाले काय हिला! हिच्या उडयांपायी मी घाबरलो, म्हटलं हिचा पाय माझ्या शेपटीवर जरी पडला तर वाट लागायची म्हणून मी पण आपला उड्या मारायला लागलो. उड्या म्हणजे काय आपलं Favourite काम. झालं! ती मुलगी आणि मी एकमेकांना Competition देत उडया मारतोय. आता ती मुलगी भलतीच घाबरली. किंचाळणं अधिक कर्कश्य झालं होतं.
त्या काकू बिचा-या शांत उभ्या होत्या. पण ही बया! हिच्या ह्या विचित्र प्रकारांमध्ये त्या काकूंना धक्का लागून कधी त्या पडल्या हे कोणाला कळलंही नाही तेव्हा अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली.. ही मुलगी मला घाबरून एवढा थयथयाट करतीये हो$$य !! वा..! आपल्याला कोणी एवढं घाबरू शकतं!! एवढा वट आहे आपला?!? ह्या कल्पनेने एवढ्या गोंगाटातही गुदगुल्या झाल्या आणि अभिमानाने कॉलर ताठ झाली. अजून काही व्हायच्या आत नशीब ४था मजला आला. दरवाजा उघडला आणि मी सुटलो.
बाहेर निघताना मला ऐकू आले 'अदिती, चल बाहेर लवकर, कहर केलास ओरडून ओरडून'. तर अदिती नाव होते तिचे. माणसाने किती घाबरट असावं याची काही सीमा की खरंच मी लोकांना एवढा घाबरवू शकतो असा विचार करतच आमच्या नेहमीच्या रस्त्याने मी सरडेंकडे प्रस्थान केले.
हुश्य!! नको रे बाबा$$ ही माणसं नकोत, यांची लिफ्टही नको. आम्ही बरे आणि आमची सुपरफास्ट लिफ्ट बरी असे म्हणत मी सरडेंकडे पाऊल ठेवत नाही इतक्यात समोर Miss चिचुंद्रे दिसल्या! 'Mr. उंदरे तुम्ही!?' या त्यांच्या शब्दांनी पुन्हा गुदगुल्या झाल्या आणि एवढ्या धावपळीचं सार्थक झालं असं म्हणत आपोआप माझ्या चेह-यावर स्मितहास्य उमटलं!